अनोळखी ८५ वर्षाचा वृध्दा ओळखीचा वाटल्यास तुळजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा – पोलिस उप निरीक्षक धनूरे

अनोळखी ८५ वर्षाचा वृध्दा ओळखीचा वाटल्यास तुळजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा – पोलिस उप निरीक्षक धनूरे

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातीलये छञपती शिवाजी महाराज चौकात अत्यवस्थेत अवस्थेत आढळलेल्या अनोळखी ८५ वर्षाचा वृध्दाला उपचारासाठी रग्नालयात दाखल केले असता तो उपचार चालु असताना मयत झाला या बाबतीत अधिक माहीती असी की येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ८५ वर्षाचा अनोळखी वृध्द सोमवार दि.१३ जानेवारी रोजी अत्यवस्थेत आढळला होता पोलिसांनी त्यास तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता त्याची गंभीर प्रकृती पाहता त्यास धाराशिव येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठवले असता तो गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी उपचार चालु असताना मयत झाला.
सदरील मयत इसमाचा चेहरा उभट असुन दाढी पांढरी  शरीर सडपातळ असुन सदरील वर्णनाचा इसम ओळखीचा वाटल्यास तुळजापूर पोलिस ठाण्याशी तसेच पोलिस उप निरीक्षक ए.आर.धनुरे यांच्याशी संपर्क साधावा आसे आव्हाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!