तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
सुरज शांतीलाल देवकर वय ३५, राहणार बाळे, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

देवकर यांनी एका २४ वर्षीय तरुणाविरुद्ध दाखल गुन्ह्यातून त्याचे नाव वगळण्यासाठी आणि त्याला अटक न करण्यासाठी १,००,००० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने धाराशिव ACB कडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, देवकर यांच्या अधिपत्याखालील पोलीस अंमलदार या गुन्ह्याचा तपास करत होते. ACB ने तक्रारीची पडताळणी १७ जानेवारी २०२५ रोजी केली. या पडताळणी दरम्यान, देवकर यांनी पंचासमक्ष १,००,००० रुपयांची लाच मागितली आणि पहिला हप्ता म्हणून ५०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर, ACB ने सापळा रचला. देवकर यांनी आज, १७ जानेवारी २०२५ रोजी, पंचासमक्ष ५०,००० रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.धाराशिव ACB युनिटचे पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केले. या कारवाईत पोलीस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, विशाल डोके, शशिकांत हजारे यांचा समावेश होता.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर यांच्यावर तामलवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
