तुळजापूरच्या जिजामाता नगर येथील हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील जिजामाता नगर येथे सौ रोहीणी बालाजी तट यांच्या वतीने संक्रातीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. यावेळी जिजामाता नगर व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी रोहीणी तट यांच्या वतीने महिलांना विठ्ठल रखुमाईची मुर्ती भेट देण्यात आली. यावेळी संगिता तट, अनिता घोगरे, सुरेखा चोपदार, अश्विनी काळे, पुजा केवडकर, रुपाली घाडगे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.