एसआयएस कंपनीवर कायदेशीर गुन्हे दाखल करून कंपनीचा ठेका रद्द करावा;जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे मागणी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजाभवानी मंदिरमधील सिक्युरिटी गार्ड हे मंदिरात अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गुंडगिरी करीत भाविकांना नाहक त्रास देत असल्यामुळे त्यांच्या कायदेशीर कारवाई करणेबाबत. दि.१६ जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांना शिवसेना नेते अमोल जाधव यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये एसआयएस या कंपनीमार्फत भरती केलेला अनाधिकृत सिक्युरिटी गार्ड बिभिषण माने यांच्यावर कलम ३०७ चे गुन्हे दाखल असून तो व्यक्ती मंदिरात प्रत्येक ठिकाणी चोपदार दरवाजा, व्हीआयपी गेट फिरतो, प्रत्येक सिक्यिरिटी गार्ड महिला पुरूष व भाविकांना त्रास देतो, बिगर पासचे माणसे आत सोडतो, शाहूराज माने हा व्यक्ती मंदिरातील पुजाऱ्यांना मंदिर बंदि असताना त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेलेले फोटो आणि अर्ज दिल्यानंतर तात्कालीन तहसिलदार योगिता कोल्हे यांनी कामावरून काढून टाकण्यात आले होते, तरी एसआयएस कंपनीने हे दोन गुंड मंदिरात गुंडगिरी प्रवृत्तीचे पवनचक्कीवाल्याने जसे गुंड पाळलेले आहेत, तसे एसआयएस “कंपनीने कामावरून काढून टाकलेले ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, यांचे मोबाईल कॉलिंक, सिडीआर व यांची सिसिटीव्ही फुटेज चौकशी करून गुन्हे दाखल करावे, असा यापूर्वी अर्ज दिलेला होता व सदर अर्जात दिनांक ९/१/२०२५ रोजी उपोषणास बसणार असल्याचे सांगितले होते, परंतू श्री तुळजाभवानीची शाकंभरी महोत्सव असल्यामुळे उपोषण पुढे डकलण्यात आले होते.तरी पुनश्च विनंती की, सिक्युरिटी गार्ड हे बिभिषण माने हा दिनांक १५/०१/२०२५ रोजी सायंकाळी ५.३३ मि व्हीआयपीचे रजिस्टर चेक करण्याचे अधिकार कोणी दिले आहे, तरी बिभिषण माने हा रंगेहाथ काल पकडलेला आहे, त्यामुळे सदरील बिभिषण माने व त्यास साथ देणारा एसआयएस कंपनी यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून कंपनीचा ठेका रद्द करावा, आपण जर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल नाही केल्यास नाविलाजास्तव तुळजाभवानी कार्यालयच्या समोर दिनांक २०/१/२०२५ रोजी मंदिराच्या समोर अमरण उपोषणास बसणार आहे. या निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.