बनावट दस्त प्रकरणी महसूल अधिकारी,रजिस्टर, देणार घेणार, दस्त तयार करणार कोणावर नेमका गुन्हा दाखल होणार कोणार ?

बनावट दस्त प्रकरणी महसूल अधिकारी,रजिस्टर, देणार घेणार, दस्त तयार करणार कोणावर नेमका गुन्हा दाखल होणार कोणार ?

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे डिसेंबर महिन्यामध्ये गट नंबर 176 मधील-अकृषक क्षेत्राची दस्त नोंदणी झालेली होती. मात्र सदर दस्तासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असलेबाबत तक्रार आल्याने दस्ताची पडताळणी करण्यात आली.

दस्तासोबत तहसील कार्यालयातून दिलेले असल्याचे दाखवलेले अकृषिक आदेश बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने दस्त करून देणार व घेणार यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे फिर्याद देण्यात आलेली होती. पडताळणी अंती संबंधित दस्त लिहून देणार व घेणार यांच्यावर विरुद्ध पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पोलिसामार्फत तपास सुरू आहे.

शेतीचे व जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्राची पडताळणी करूनच व्यवहार करावेत जेणेकरून फसवणूक टाळता येईल असे आवाहन तहसील कार्यालय तुळजापूर यांचे मार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!