धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीका दोन ते तीन महिन्यातलागू शकतात !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते. त्यामुळे आता तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गाव गावचे नेते उत्सुक झाले आहेत.त्यामध्येच विधानसभा लोकसभेला व तालुक्यात गटा तटात गटांनी केलेली युती ही बऱ्याच कार्यकर्त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकसभा विधानसभेची युतीच काय होणार ? तर विधानसभेला कॉग्रेसला जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी देखील भरघोस मिळालेले मतदान पाह- ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी भलतीच कंबर कसल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या विरोधात असणारे शहरातील नेते आपलाच आमदार म्हणत लोकप्रतिनिधित्व केले .परंतु सध्याच्या राजकारणाच्या घडामोडी पाहता या गटातटीच्या गटामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला एकमत होईल का ? जर एकमत नाही झाले तर सर्वच पक्षाचे नेते उमेदवारांना तिकीट देणार का ? विधानसभा निवडणुकीनंतर जनतेशी एकनिष्ठ राहत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर शहरांमध्ये सुरू केलेला जनता दरबार व त्या दरबाराला लोकांचा मिळत असणारा प्रतिसाद हे पाहता तालुक्यातील प्रस्थापितांना मोठा धक्का बसत आहे.त्याचबरोबर विद्यमान आमदाराकडे कामासाठी लागणाऱ्या रांगा पाहता विरोधक गपगार अवस्थेत दिसत आहेत नक्की काय घेणार भूमिका ?आमदारांकडे लोकांचा वाढता कल हे विद्यमान आमदार खासदार साठी धोक्याची घंटा संबोधली जात आहे. यांचा जनता दरबार हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने भाजपसाठी जमेची बाजू संबोधली जातेमिळाले तर गटात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका घ्यावी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो जर कदाचित असे झाले तर कॉग्रेस पक्षाची नाराजी कदाचित महागाईत पडू शकते.तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला भाजप मुसंडी मारेल यात कोणती शंका नाही. जर भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बाजी मारली तर तालुक्यातील स्थानिक नेत्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे कदाचित अस्तित्व टिकवण्यासाठी इतर पक्षाचे नेते यावर कोणती उपाययोजना करतील हे येणाऱ्या काळातच ठरेल.