शाकंभरी महोत्सव कार्यक्रमानी साजरा
भूम : औदुंबर जाधव
भूम येथील श्री चौंडेश्वरी देवी शाकंभरी पौर्णिमा महोत्सव ६३ व्या वर्षात अखंड हरिनाम सप्ताह, डॉक्टर श्रीकांत फलके मार्ग या फलकाचे अनावरण, रक्तदान शिबिर , किर्तन सेवा, भारुडातून प्रबोधना बरोबर शहराच्या प्रमुख मार्गाने भक्तीचा जागर करत संपन्न झाला.
दि ५ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान समस्त कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सव विविध कार्यक्रमाला साजरा केला यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, रक्तदान शिबिर, भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले, समारोपाच्या दिवशी शाकंभरी देवीच्या पालखीची शहराच्या प्रमुख मार्गाने साधुसंतांच्या विचाराचा जागर करणारी पालखीची मिरवणूक काढण्यात आली , याच दरम्यान शेंडगे गल्ली या ठिकाणी लोकनेते उबाठा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू महाराज, तालुका प्रमुख अनिल शेंडगे , नामदेव शेंडगे , माजी नगरसेवक संतोष शेंडगे, राष्ट्रवादीचे नेते अखतर जमादार, राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेश सदस्य नाना मदनेसह अनेकांनी जागर पालखीचे स्वागत केले .
खामकर गल्ली या ठिकाणी संपूर्ण खामकर परिवाराच्यावतीने परंपरेनुसार केळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला , गांधी चौक या ठिकाणी आरोग्य दूत म्हणून ज्यांनी चाळीस वर्षे अविरतपणे सेवा केली अशा डॉ. श्रीकांत फलके यांच्या नावाने कसबा भागाकडे जाणाऱ्या मार्गाला डॉ . श्रीकांत फलके मार्गाचे लोकनेत्यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण करण्यात आले, यावेळी माजी नगराध्यक्ष शिवाजी गाढवे, भाजपचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर , तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, सिद्धार्थ जाधव, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब मस्कर , शिवसेनेचे दिलीप शाळू महाराज, पत्रकार चंद्रमणी गायकवाड, अनिल शेंडगे , विधीज्ञ आकरे, रोहन जाधव, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, बाळासाहेब फलके, शैलेश फलकेसह अनेकांची उपस्थिती होती .
जागर फेरि दरम्यान शहरातील प्रमुख चौकामध्ये महिलांनी फुगडी खेळा बरोबर टाळ व लेझीम महिला पथकांनी विविध गाण्यावर कला सादरीकरण केले . शालेय टाळकरी मुलांनी सुंदर कला सादरीकरण केले . समारोपा दरम्यान भाविक भक्तांना संत भोजन म्हणून महाप्रसाद देण्यात आला . सायंकाळी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला . संपूर्ण कार्यक्रमासाठी उत्सव समिती पदाधिकारी , तरुण मंडळ , पदाधिकारी, कोष्टी समाज पदाधिकारी , महिला भगिनीनी अथक परिश्रम घेतले.