तुळजापूर विधीज्ञ संघाचा अध्यक्ष पदी ॲड. दत्तात्रय घोडके
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधीज्ञ संघाचा चुरशीचा निवडणूकीत ॲड. दत्तात्रय घोडके (८२) यांनी ॲड. नागनाथ कानडे (४५) यांचा तब्बल ३७ मतांनी पराभव करत अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. या निवडणूकीत ॲड. घोडके पॅनल ने ०५ जागी विजय मिळवला. निकालानंतर विजयी विधीज्ञांचा सत्कार करण्यात आला.
तुळजापूर विधीज्ञ संघासाठी शुक्रवार (दि. १०) सकाळी ०८:३० वाजता मतदानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी १२७ विधीज्ञांनी मतदानाचा हक्क बजावला तर ०५ विधीज्ञ मतदानाला अनुपस्थित राहिले.
मतदाना नंतर लगेच दुपारी ०३ वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. चुरशीचा निवडणूकीत ॲड. घोडके पॅनल ने ०५ जागा जिंकत वर्चस्व स्थापित केले. ॲड. घोडके पॅनल चे सहसचिव पदाचे ॲड. अजीमोद्दिन काझी व समन्वयक पदाचे ॲड. शुभम झाडपीडे यांना पराभव पत्करावा लागला.
निवडणूक प्रक्रिया जेष्ठ विधीज्ञ ॲड. तानाजी जगताप, ॲड. संगिता कोळेकर व ॲड. किरण कुलकर्णी, ॲड. वैभव भट्टू, ॲड. क्रांती कोरके – थिटे आदिंनी पार पाडली.

● उपाध्यक्ष पदी भारत बर्वे
उपाध्यक्ष –
१. ॲड. भारत बर्वे (७१) विजयी
२. ॲड. सुधीर पटाडे (५३)
सचिव
१. ॲड. नीलकंठ वट्टे (६९) विजयी
२. ॲड. प्रवीण लोमटे (५२)
सहसचिव –
१. ॲड. सरफराज बागवान (६५) विजयी
२. ॲड. अजीमोद्दिन काझी (५८)
कोषाध्यक्ष –
१. ॲड. विश्वास डोइफोडे (६९) विजयी
२. ॲड. किरण इंगोले (५६)
महिला प्रतिनिधी –
१. ॲड. सिमा साळुंखे (६४) विजयी
२. ॲड. स्वाती वाघमारे (५८)
समन्वयक
१. ॲड. वैजीनाथ नवगीरे (५९) विजयी
२. ॲड. शुभम झाडपीडे (५२)
स