भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास तुळजापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथे माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशाने व युवक नेतृत्व विनोद पिटू गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. शहरातील सर्व बुथ मध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता विशेषतः लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे महिला वर्गाने जास्तीत जास्त सदस्य नोंदणीत सहभाग नोंदविला . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे शहराध्यक्ष शांताराम पेंदे सरचिटणीस धैर्यशील दरेकर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजेश्वर कदम युवा मोर्चा शहराध्यक्ष राम चोपदार दिनेश शिरसागर सौ सुरेखा ताई पवार नितीन पवार रमेश पवार राहुल चव्हाण विक्रम पवार सचिन राठोड काशिनाथ पवार अशीश साळुंखे अजय कांबळे संकेत घोगरे अजित तोडकरी व शहरातील प्रमुख सर्व भाजप कार्यकर्ते व बूथ प्रमुख उपस्थित होते