३१ डिसेंबर पासून ७ जानेवारी पर्यंत श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणून असलेली आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवदिनांक ३१ डिसेंम्बर २०२४, पौष शुद्ध १ शके १९४६ रोजी देवीजींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला. सायंकाळी अभिषेक समाप्ती नंतर देवीजींच्या मंचकी निद्रा सुरू झाली असून दिनांक ०७/०१/२०२५ रोजी पहाटे पर्यंत मंचकी निद्रा सुरू असेल. यानंतर दिनांक ०७/०१/२०२५ (पौष शुद्ध ८ शके १९४६) रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. या दिवशी दुपारी १२ वाजता घटस्थापना होईल.
