तुळजापूर तालुक्यातील टॉवरबाधित शेतकऱ्यांना सुप्रीमकोर्टाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आक्रम राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी

तुळजापूर तालुक्यातील टॉवरबाधित शेतकऱ्यांना सुप्रीमकोर्टाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आक्रम राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या पवनचक्कीच्या टावर लाईनटावरबाधीत शेतीमालक हे आजही पवनचक्की टावरलाईन कंपनीबद्दल वाईट भावना ठेऊन नाहीत परंतु कंपनीने उदार अंतःकरणाने शेतकऱ्यांना जाहीर माफी प्रसीद्धीपत्रकाद्वारे मागुन सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा समीतीच्या शिफारशीनुसार जमीनीच महसुली मोजमापन भुसंपादन विभागाकडून करुन कृषी विभाग वन विभाग यांच्यावतीने संयुक्त पहाणीद्वारे अथवा सुप्रीम कोर्टाचे आदेशाप्रमाणे २० लाख रुपये प्रतीटावर नुकसानभरपाई द्यावी व उगीच अंगात आल्यागत शेतकर्यांच्या अंगावर पोलीस, महसुली प्रशासन, न्यायालय, खासगी बॉउनसर सोडुन शेतकऱ्यांना डिवचायचे काम पवनचक्की कंपनीने करण्याचं काही कारण नाही अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) तुळजापूर तालुकाध्यक्ष या जबाबदार पदावर राहुन सांगतो पवनचक्की कंपन्यानी हिशोबात रहावे अन्यथा कंपन्यांना योग्य तो धडा शिकवीला जाईल रिन्यु पावरने पैशाची मस्ती तुळजापूर तालुक्यात दाखऊ नये अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी तुळजापूर पार्टी तर्फे समजेल त्या भाषेत कंपनीस अद्दल घडवीली जाईल आम्ही शेतकऱ्यांसोबत मिळुन या कंपनीचा पक्का बंदोबस्त करु. माझी जिल्हा प्रशासनाला विनंती असेल रिन्यु पावर प्रोजेक्ट ४०० केव्ही सबस्टेशन व ट्रान्समीशन या प्रोजेक्टच्या सर्व बाधीत शेतकर्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी…शेतकर्यांना टावर उभा करताना १५ लाख देतो म्हणुन कसलीही सम्मती न घेता विरोध बळपुर्वक डावलुन नादाला लाऊन प्रत्यक्षात २ लाखात टावर काम कम्पलीट करुन फसवणुक केल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजर लक्ष्मीनारायण दास व ROW अधीकारी गांगुर्डे यांच्यावर फसवनुकीचा गुन्हा दाखल करावा. तसेच टावरलाईन मधील दलाल, एजंट, पवनचक्की टावर भु माफीया लोकांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा…यावेळी चिवरी उमरगा, शिरगापूर, गंधोरा यागावचे टावर बाधीत शेतकरी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!