तुळजापुरात अँड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मराठा समाज आक्रमक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दि,.१८ डिसेंबर रोजी मराठा समाजाच्याकार्यकर्त्यांनी भवानी रोड शहाजी महाद्वार परिसरात मराठा समाजाचा आक्रोश . सदावर्ते यांच्यावर मराठा समाजाबाबत सातत्याने बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी बुक्का फेकत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.सदावर्ते हे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी तुळजापूर येथे आले होते. मात्र, त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच मराठा कार्यकर्ते संतप्त झाले आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलीस प्रशासनाने उचित दुर्घटना मराठा समाजाकडून हो दिले नाही.सदावर्ते यांच्याविरोधातील कार्यकर्त्यांचा रोष पाहता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सदावर्ते यांच्यावरील आरोप आणि आजच्या गोंधळावर अद्याप त्यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेने तुळजापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.