तुळजापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदात मध्ये एकुण २२५ प्रकरणामध्ये तडजोड झाली.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद ( धाराशिव) यांच्या निर्देशानुसार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी तुळजापूर न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. तुळजापूर मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ठिक १०.१५ वाजता मा.श्री. एम. एम. निकम दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तुळजापूर यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने लोकअदालतीचे उद्घाटन झाले.यावेळी श्रीमती पी.एस.जी. चाळकर सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तुळजापूर, श्री. के. एस. कुलकर्णी २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापूर, विधिज्ञ मंडळ तुळजापूर येथील विधीज्ञ, श्री. रविंद्र खांडेकर पोलीस निरीक्षक तुळजापूर, श्री. एम. जी. टेकाळे पोलीस उपनिरीक्षक तामलवाडी, श्री. आनंद कांगोने, सहायक पोलीस उपनिरीक्षक नळदुर्ग, सरकारी वकील श्री. अमोघसिध्द कोरे तसेच सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, कर्मचारी, सर्व न्यायीक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँक अधिकारी व कर्मचारी, हायवे पोलीस नळदुर्ग येथील पोलीस कर्मचारी, पक्षकार व त्यांचे विधीज्ञ मोठया संख्येने उपस्थित होते.सदर लोकअदालतीमध्ये तुळजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाची अशी एकुण १४०९ व दावा पुर्व एकुण २०८२ अशी एकुण ३४९१ प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याकरीता या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी प्रलंबित दिवाणी व फौजदारी स्वरुपाच्या ४९ प्रकरणांमध्ये तसेच वाद पुर्व प्रकरणांमध्ये १७६ अशी एकुण २२५ प्रकरणामध्ये तडजोड झाली. धनादेश अनादर प्रकरणी फिर्यादी पक्षाला रूपये २४,३९,२९०/- वसूली झाली. तसेच बँकेशी संबधीत प्रकरणामध्ये वादी यांना ५१,०८,४७९/- रुपये मिळाले. दावा पुर्व प्रकरणांमध्ये रूपये ३८,६७,२४४/- रक्कमेची संबंधीत नगरपरिषद, बँक, ग्रामपंचायतीला वसूली झाली. त्याचबरोबर किरकोळ फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आरोपींना दंडात्मक शिक्षा होवून रक्कम रू. १०,६५०/- इतका दंड करणेत आला. महामार्ग पोलीस केंद्र नळदुर्ग आणि परिवहन विभाग धाराशिव यांना कसुरदार वाहन चालक यांचे कडून दंडात्मक रक्कम रुपये ३२,४००/- वसूली झाली. सदर लोक अदालतीस पक्षकार/विद्यीज्ञ, बॅक कर्मचारी, तसेच ग्रामपंचायत व नगर परिषद कर्मचारी यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.तुळजापूर न्यायालयातील सर्व न्यायीक वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, तुळजापूर विधीज्ञ संघाचे सर्व सदस्य, तुळजापूर पोलीस ठाणेकडील न्यायालयात नेमणूक असलेले पोलीस कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले.
