प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तामलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील आरोपी निळोबा हरिहर जाधव, वय ३५ वर्ष यांनी दि.१४ डिसेंबर रोजी ५:१५ वाजन्याच्या सुमारास देवकुराळी येथील काटगाव येथे पिकअप वाहन क्रं.एम.एच 25 ए.जे -3997 या मध्ये २ खोंडे,१ रेडी, ३ हलगट वाहनासह अंदाजे २,१४,०००₹ किंमतीचे वाहना मध्ये दाटीवाटीने बांधून निर्दयतेने वागणुक देवून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांचे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करत असताना तामलवाडी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम -११(१) (के) सह प्राणी संरक्षण कायदा कलम ५(बी) सह मो.वा.का. ८३,१७७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.