शाकंभरी नवरात्र महोत्सवाची नियोजन बैठक तुळजाभवानी संस्थान येथे पार पडली ! प्रशासनाकडून तयारीस सुरुवात
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मातेच्याशाकंभरी नवरात्र महोत्सव 2024-25 च्या नियोजनासाठीची आढावा बैठक जिल्हाधिकारी मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावर्षीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव दि 07 जानेवारी ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे.या नियोजन बैठकीमध्ये शाकंभरी महोत्सवासाठी मुख्य यजमान नियुक्ती, श्री देवीजींचे सिंहासन पूजेबाबत, धार्मिक कार्यक्रम साजरे करणेबाबत, जलयात्रेचे मिरवणुकीबाबत, सुवासिनी पास, नवरात्र काळातील मंदिर परिसरातील स्वच्छता व सुरक्षा इत्यादी बाबींविषयी चर्चा झाली.दिनांक 31 डिसेंम्बर 2024 रोजी देवीजींची मंचकी निद्रा सुरू होणार असून 7 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या महोत्सवासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासनाने तयारीचे नियोजन केले आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी मैनक घोष यांच्यासह तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, नगरपालिका स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंखे, मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले तसेच तिनही पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.