भूम : औदुंबर जाधव
सदानंदेचा येळकोट येळकोट घे च्या गजरात वाकवड ता भूम येथील प्रसिद्ध देवस्थान खंडोबा मंदीर येथे चंपाषष्ठी निमित्ताने ( सट ) सकाळपासून भानिकांनी दर्शनासाठी गर्दी दिसून आली या निमित्ताने भाविकांच्या रांगा होत्या वाकवड येथे दोन दिवस यात्रा भरते या निमित्ताने नवरात्र नंदादिप सात दिवस सप्ताह भजन किर्तन अयोजन करण्यात आले होते दि ६ रोजी संध्याकाळी संगीत विशारद प्रसाद देशमुख सुयोग केसकर व संगीत अलंकार ए पी देशपांडे यांचे संगीत भजन रंगले पहाटे वेदशास्र्स राजाभाउ धर्माधिकारी यांच्या उपस्थित श्री खंडोबा म्हाळसा बाणाई यांच्या मुर्तीस महाअभिषेक व यज्ञ पार पडला आज सटीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती या निमित्ताई बेल भंडार उधळन केल्याने मंदीर परिसर पिवळा पडला होता सासुरवासीन लेकी व नैकरी निमित्त बाहेरगावी आसलेल्या नागरिकांनी यात्रेच्या निमित्ताने वाकवड येथे गर्दी दिसून आली यात्रेच्या निमित्ताने देवाचा छबिना पालखी हजेरी आदी कार्यक्रमासोबत तीन दिवस सायंकाळी तमाशाचे अयोजन करण्यात आले आसून रविवारी कुस्त्याचा फड रंगणार आहे या यात्रेसाठी खंडोबा देवस्त ग्रामपंचायत कार्यालय व समस्त वाकवड ग्रामस्त विषेश परिश्रम घेत आहे या यात्रेसाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे