ज्येष्ठ पदाधिकारी संतोष डोईफोडे यांचा संस्कार भारतीच्या वतीने सत्कार
तुळजापूर : प्रतिनिधी
संस्कार भारती जिल्हा धाराशिव प्राचीन कला विभाग प्रमुख म्हणून काम करणारे संतोष जी डोईफोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संस्कार भारतीची विशेष बैठक संपन्न झाली आहे महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री यांनी पदभार घेतला या नव्या सरकारला देखील या बैठकीत शुभेच्छा देण्यात आले व या निमित्ताने अविनाश धट , सतीश महामुनी यांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्ताने संतोष डोईफोडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगीलक्ष्मीकांत सुलाखे, सौ.अनिता महामुनी, सृष्टी महामुनी, भालचन्द्र गोडसे यांची याप्रसंगी उपस्थिती होती.