सासरच्यांकडून महिला पोलिसाचा शारीरिक, मानसिक छळ; नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नळदुर्ग : प्रतिनिधी

येथे एका महिलेला सासरचे लोक पती – सचिन सुर्यकांत भाजीपाले, सासू – लक्ष्मीबाई सुर्यकांत भाजीपाले, सासरा – सुर्यकांत मोतीराम भाजीपाले, दीर – मारोती सुर्यकांत भाजीपाले,दीर – योगेश सुर्यकांत भाजीपाले, सर्व रा.मुंडेवाडी ता.कंधार, जि.नांदेड, ह.मु. क्रश उत्कर्ष चाळ कमिटी ४ चाळ रोड, रमाबाई कॉलनी, घाटकोपर पूर्व मुंबई,आणि चुलत सासरा – सुभाष मोतीराम भाजीपाले, रा. गुंजोटी ता.उमरगा, जि.धाराशिव यांनी संगनमत करून तुला टी.बी.चा आजार आहे, तुला आम्ही नांदवत नाही. तु आमच्या घरात आल्यापासून आमचे चांगले झाले नाही तु आम्हास शोभत नाहीस योग्य नाहीस असे म्हणुन मला सतत शिवीगाळ करुन तुला घरातील स्वयंपाक येत नाही असे म्हणून मला नेहमीच घरात टोचून घालून पाडून बोलून, तु तुझ्या नोकरीच्या पगारातुन व तुझे आई वडीलांकडून पाच लाख रूपये घेवून ये तरच तुला नांदवू असे म्हणून मला नेहमीच शिवीगाळ करून मानसिक व शारीरीक छळ करून तु पोलीस खात्यात नोकरी कशी काय करते तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. अशा दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या ६ जणांवर भा.न्या.सं. (बी.एन. एस.२०२३) कलम ३(५), ३५१(२),३५२, ८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!