भुम : औदुंबर जाधव
मौजे कपिलापूरी ता.परांडा येथे दिं.25/11/2024 रोजी मांतग समाजातील कुटुंबातील महिला पुरुषावर गावातील गांवगुंडानी विधानसभेतील निवडणुकीत आमच्या पक्षाच्या विरोधात का प्रचार केलास म्हणून करून लोखंडी राॅड ने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन फरार झालेले आहेत या प्रकरणी परांडा पोलिस ठाण्यात या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद देखील करण्यात आलेला आहे परंतू आज सहा दिवस झालेले असताना देखील आरोपीना अटक करण्यात आलेली नाही या घटनेतील आरोपी हे राजकीय व पैशाचा वापर करून पोलिस प्रशासनास कारवाई करण्यास विलंब करत आहे या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी सकल मांतग समाज भुम परांडा वाशी च्या वतीने पोलिस उप अधिक्षक कार्यालय भूम यांना निवेदन दिले असून यात आरोपींना त्वरित शोधून अटक करण्याची मागणी केली आहे या घटनेवरून आजूबाजूला राहणार्या मांतग समाज हा भयभीत झालेला आहे तसेच आरोपींना पंधरा दिवसांत तत्काळ अटक करून कारवाई न झाल्यास सकल मांतग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे निवेदनावर बाळासाहेब थोरात , प्रदिप साठे , जालिंदर थोरात , रोहन थोरात , गणेश साठे , नितीन साठे , अमोल थोरात , विकास मिसाळ , पवन थोरात , भरत अलाट ,ओम फुलावळे ,आर्यन कांबळे ,सुरज थोरात ,दादासाहेब थोरात ,राहुल मिसाळ आदिचीं स्वाक्षरी आहे