संजीवनी सामान्यज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान

तुळजापूर : प्रतिनिधी

भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन शालेय व माध्यमिक स्तरावर स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, विद्यार्थ्यांचा पाया पक्का व्हावा, या उद्देशाने संजीवनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने महाराष्ट्रभर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. यावर्षी जुलै महिन्यात तुळजापूर मधील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तुळजापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदरची ही परीक्षा दोन गटातून घेण्यात आले. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी चा ‘अ’ गट आणि आठवी ते दहावी ‘ब ‘ गट असे दोन गटात परीक्षा घेण्यात आल्या .त्यामध्ये अ गटातून सरस्वती महाविद्यालयाच्या पूजा रावसाहेब सिद्धगणेश हिने 200 पैकी 154 गुण मिळून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली .तर जिजामाता कन्या प्रशालेची रागिनी सिद्धगणेश 152 गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या श्रावणी कोलार हिने 149 गुण मिळवून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. तसेच कुलस्वामिनी विद्यालयातील पृथ्वीराज चव्हाण व साक्षी नागमोडे यांनी अनुक्रमे 141 गुण मिळवून चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.तसेच ब गटातून कुलस्वामिनी शाळेतून अंबिका शिंदे हिने 200 पैकी 143 गुण मिळवून प्रथम क्रमांक फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूलचा दुर्गेश देशमुख 137 गुण मिळवून द्वितीय क्रमांक, जिजामाता कन्या प्रशालेची सृष्टी तोमर 136 गुण मिळवून तृतीय क्रमांक तर तुळजाभवानी विद्यालयाच्या गोपाळ राठोड याने 130 गुण मिळवून चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरला. या सर्व विद्यार्थ्यांचे तुळजापूर येथील कुलस्वामिनी प्रशालेत रोटरी क्लब ऑफ तुळजापूरचे अध्यक्ष प्रशांतजी अपराध प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद खुरुद, प्रशालेचे माजी विद्यार्थी सूरज शित्रे, आणि संजीवनी स्पर्धा परीक्षाचे संयोजक सिद्राम तट्टे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपताना शिक्षक जळकोटे व आभार क्रीडा शिक्षक धोत्रे यांनी मांनले.यावेळी प्रशालेतील शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!