जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद;नागरिकांच्या समस्या ऐकून त्वरित मार्गी लावण्याचा निर्धार – आनंद कंदले
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील प्रभाग क्र. ५ येथे आ. राणाजगजीतसिंह पाटील, युवा नेते विनोद गंगणे व नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार क्र.३ पार पडला. या दरबारात नागरिकांनी शासकीय कार्यालयांशी संबंधित विविध तक्रारी,अडचणी व मागण्या मांडल्या.संबंधित विभागाशी तातडीने समन्वय साधून अनेक समस्या जागेवरच निकाली काढण्यात आल्या.
दरबारात पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था,वीजपुरवठा तसेच सार्वजनिक सोयी-सुविधांबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. आमदार पाटील यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले,शांताराम पेंदे,किशोर साठे,औदुंबर कदम, माऊली भोसले, प्रशांत इंगळे, बाळासाहेब भोसले,विवेक इंगळे, रत्नदीप भोसले,धैर्यशील दरेकर, रविदादा भोसले,अक्षय पेंदे, कालिदास गवळी,अनिकेत भोसले,ओम भोसले,परशुराम कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान,भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना,“समस्यांचे त्वरित निराकरण करणे हेच आमचे प्राधान्य असून जनता दरबार हा नागरिक व प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत पूल ठरत आहे,” असे प्रतिपादन केले.