राजकारणातील राजहंस : माजी नगराध्यक्ष पंडीतराव जगदाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…
तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आदरणीय पंडीतराव जगदाळे यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना सहसंफर्क प्रमुख अमरराजे कदम, तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. सतिश महामुनी, माजी नगरसेवक दयानंद हिबारे, उद्योजक बालाजी ढोबळे, तसेच प्रदिप गुरव, झाडपिडे सर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
पंडीतराव जगदाळे यांनी आपल्या कारकिर्दीत नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत तुळजापूरच्या विकासाचा वेग वाढविला. त्यांच्या कार्यपद्धतीतून नेहमीच लोककल्याणाची झलक दिसून आली आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणातील राजहंस अशी उपाधी तुळजापूरातील नागरिकांकडून लाभली आहे.वाढदिवसानिमित्त आलेल्या शुभेच्छुकांनी त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या. यावेळी पंडीतराव जगदाळे यांनीही सर्वांचे आभार मानत, “जनतेच्या प्रेमामुळेच आज मी या उंचीवर आहे. तुळजापूरच्या विकासासाठी नेहमीच तत्पर राहीन,” अशी भावना तुळजापूरनामा न्युज शी बोलताना व्यक्त केली.