माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी शेळीपालन प्रशिक्षण
नोंदणीसाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत
धाराशिव, : प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्र,धाराशिव आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील माजी सैनिक,त्यांच्या पत्नी,वीरनारी, विधवा पत्नी व पाल्यांसाठी शेळी पालनावर आधारित १२ ते १५ दिवसांचे निशुल्क प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणाचा उद्देश माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना स्वतंत्र रोजगार व उद्योजकतेसाठी सक्षम करणे हा असून,महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार हे प्रशिक्षण लवकरच घेण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी आपली नावे दि.१४ ऑगस्ट २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे नोंदवावीत.नोंदणीसाठी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 022472-222557 / 7588527554
जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.