न.प.धाराशिव मा.नगरसेवक तथा ॲड,विशाल प्रभाकर साखरे यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावान पदाधिकारी असून वेळोवेळी माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडत असतात. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालयातील नामांकित वकील तथा नगरपरिषद धाराशिव चे माजी नगरसेवक ॲड.विशाल साखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते पदी निवड केली आहे. तुळजापूर तालुक्यातील लोहारा येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने तसेच तसेच लिंगायत तेली समाजाच्या वतीने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला यावेळी धाराशिव, उमरगा, लोहारा परिसरातील तेली समाजाती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित.