माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय सेवा योजना, ग्रीन क्लब, क्रीडा विभाग यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगांवकर साहेब, प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, डॉ. अनिल शित्रे, डॉ.गोविंद काळे, तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वृक्ष संगोपन करण्यासाठी विद्यार्थ्यांना या निमित्ताने प्रोत्साहित करण्यात आले.