गुलबर्गा येथील भाविकाच्या कारला मध्यरात्री लागली अचानक आग;कार जळून खाक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या गुलबर्गा येथील भाविका भक्तांच्या कार तुळजापूर शहरात रावळ गल्ली येथे मध्ये रात्री दोनच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुदैवाने जीवित हानी झाली टळली. आगीत कारचा समोरचा भाग जळाला असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना दि.५ मे रोजी रविवारी रात्री दोन च्या सुमारास घडली.
गुलबर्गा येथील भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आले होते.अचानक लागलेल्या आगीमुळे रावळ गल्लीत गोंधळ उडाला.तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस वैभव देशमुख व सुरज चांदणे हे रात्री पेट्रोलिंगला असल्यामुळे निदर्शनास आल्यामुळ त्यांनी माती व पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कारचा समोरचा भाग जळाला होता. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.
तुळजापूर शहरात रावळ गल्ली येथे अचानक आग लागलेल्या कारची झालेली अवस्था.