प्रतिकूल परिस्थितीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण पुष्पराज खोत यांचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सत्कार
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सटवाईवाडी येथील पुष्पराज नानासाहेब खोत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.त्यांनी देशभरातून ३२१ वा क्रमांक पटकावला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सत्कार आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.सत्कार समारंभाला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सरनाईक बोलतांना म्हणाले की,केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून मोजकीच मुले यश मिळवतात. अशा कठीण परीक्षेत ग्रामीण भागातील, प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्याचे यश अत्यंत प्रेरणादायी आहे.
श्री.सरनाईक पुढे म्हणाले,”हे यश फक्त पुष्पराज यांचे नाही,तर त्यांचे मार्गदर्शक शिक्षक,प्रोत्साहन देणारे पालक आणि नातेवाईक यांचेही आहे.त्यांच्या जिद्दीतून आणि परिश्रमातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल.
शेवटी,त्यांनी पुष्पराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सांगितले की, “यशाला शॉर्टकट नसतो.कष्ट आणि सातत्य हेच यशाचे खरे सूत्र आहे.असे ते म्हणाले.