सांयकाळी खासदारांचा फोटो अवतारला बँनरवर स्टेजवर राणा दादा ;गेट बॅनरवर ओम दादा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने बांधण्यात आलेले बसस्थानक प्रथम पासुन वादात सापडले आहे. या बसस्थानक चे उदघाटन बुधवार दि.३० एप्रिल रोजी सांयकाळी होत असुन यात स्टेजवर लावण्यात आलेल्या पहिल्या बँनरवर राणाजगजीतसिंह पाटील यांचा फोटो तर
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फक्त नाव बस स्थानकाच्या बाहेरच्या बॅनर वर खासदारांचा माञ फोटो नव्हता तर नंतर सांयकाळी लावलेल्या बँनर वर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो बरोबर अवतरला आहे का अचानक अवतारल्याने सोहळ्यातील सावळा गोंधळ उदघाटन सुरु होईपर्यत चालुच होता तसेच बांधकाम अपुर्ण असताना बसस्थानक उदघाटन चा घाट कशासाठी असा सवाल शहरातीलनागरिकांतून होत आहे.