राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्यालयाचे अक्षयतृतीया दिनी शुभारंभ
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात पोलीस ठाण्याच्या शेजारी शेटे काँम्पलेक्स येथे अक्षयतृतीया व महात्मा बसवेश्वर यांची जयंती औचित्य साधुन श्री.तुळजाभवानी व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) तालुका संपर्क कार्यालयाचा शुभारंभ बुधवार दि.३० एप्रिल रोजी करण्यात आले.यावेळी वीरशैव संघटनेचे प्रफुल्लकुमार शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी , रुपाली चनशेट्टी , पञकार अजित चंदनशिवे ,श्रीकांत कदम ज्ञानेश्वर गवळी ,सतिश फत्तेपुरे, सुधीर बळवंते ,भैरवनाथ भोसले, योगेश खुंटाफळे ,नागनाथ स्वामी, करण कांबळे ,इमाम शेख, सोनु नरवडे अदि प्रमुख मंडळीसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते.