परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक तीस एप्रिल ते एक मे रोजी जिल्ह्यात
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक हे ३० एप्रिल व १ मे रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.३० एप्रिल रोजी पालकमंत्री श्री.सरनाईक हे मुंबई येथून दुपारी १ वाजता खाजगी विमानाने धाराशिवकडे प्रयाण करतील. दुपारी २.१५ वाजता धाराशिव विमानतळ येथे आगमन व नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवकडे प्रयाण.दुपारी २.३५ वाजता सटवाईवाडीचे सुपुत्र पुष्कराज नानासाहेब खोत यांची संघ लोकसेवा आयोग परीक्षेत निवड झाल्याबद्दल भव्य नागरीक सत्कार सोहळ्यास राधाकृष्ण मंगल कार्यालय, तेरखडा,ता.वाशी, येथे उपस्थिती.दुपारी २.५० वाजता तेरखडा येथून शासकीय वाहनाने नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवकडे प्रयाण.दुपारी ३.१० वाजता नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आगमन व जल व्यवस्थापन कृती पंधरवडा” शासकीय कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ३.२५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने मौजे धारूरकडे प्रयाण.दुपारी ३.४५ वाजता मौजे धारूर येथे आगमन व शिवसेनेच्या युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन करतील.दुपारी ४ वाजता मौजे धारूर येथून वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण.दुपारी ४.१० वाजता तुळजापूर येथे आगमन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक नुतनीकरण उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील.तुळजापूर येथून नळदुर्गकडे प्रयाण.सायंकाळी ५ वाजता नळदुर्ग येथे आगमन व नळदुर्ग किल्ला पाहणी.नळदुर्ग येथे युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन करतील.सायंकाळी ५.४५ वाजता नळदुर्ग येथून सोलापूरकडे प्रयाण.रात्री. ९.३० वाजता सोलापूर येथून धाराशिवकडे प्रयाण.रात्री १०.४० वाजता शासकीय विश्रामगृह,धाराशिव येथे आगमन व मुक्काम.
१ मे रोजी सकाळी ७.४० वाजता शासकीय विश्रामगृह,धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.सकाळी ७.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन.सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्याचा ६६ व्या स्थापना दिवस समारंभानिमित्त “ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ” कार्यक्रमास उपस्थिती. सलग ३६५ दिवस शाळा उपक्रम राबविल्याबाबत सत्कार समारंभ. जि.प.कन्या प्रा.शाळा व जि.प.केंद्र शाळा, कसबे तडवले,येथील मुख्याध्यापक,शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.
सकाळी ८.४५ वाजता तृतीयपंथी आपले सरकार सेवा केंद्र व आधार सेवा केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय येथे करतील.सकाळी ९ वाजता भोगावती नदीतील गाळ काढणे मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ उपस्थित राहतील.
सकाळी ९.३० वाजता नागरिकांच्या भेटीसाठी राखीव पालकमंत्री कार्यालय, नियोजन भवन.सकाळी १० वाजता धाराशिव जिल्हा वार्षिक योजना सन (२०२५-२६) बैठक.नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती. दुपारी १२ वाजता धाराशिव जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक.दुपारी १२.३० वाजता धाराशिव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाला स्वयंवर मंगल कार्यालय,वाशी नाका येथे उपस्थिती.दुपारी १ वाजता धाराशिव बसस्थानक उद्द्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी २ वाजता धाराशिव येथून विमानतळाकडे प्रयाण. दुपारी २.३० वाजता धाराशिव विमानतळ येथे आगमन.दुपारी ३ वाजता खाजगी विमानाने,धाराशिव येथून सांताक्रुझ (पू), मुंबईकडे प्रयाण करतील.