पुन्हा एकदा धीरज पाटलांचा स्वतःच्या वैफल्यग्रस्तपणावर शिक्कामोर्तब गंभीर सामाजिक प्रश्नाचे राजकारण थांबवा ; समस्त तुळजापूरची बदनामी करू नका

पुन्हा एकदा धीरज पाटलांचा स्वतःच्या वैफल्यग्रस्तपणावर शिक्कामोर्तब

गंभीर सामाजिक प्रश्नाचे राजकारण थांबवा ; समस्त तुळजापूरची बदनामी करू नका – ता. अध्यक्ष संतोष बोबडे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

मागील १५ वर्षांपासून तुळजापूरमधील मायबाप जनता आम्हाला निवडून देत तुम्हाला साफ नाकारत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने तुम्हाला झिडकारले आहे. स्वतः उमेदवार असताना तुळजापूर शहरातील ३,५०० मतांची पिछाडी धीरज पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. म्हणूनच वैफल्यग्रस्तपणा धीरज पाटील अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नाचे राजकारण करीत सुटले आहेत. बालिशपणा सोडा, प्रश्नाची दाहकता समजून घ्या, उगीच उठसूट तुळजापूर आणि तुळजापूरकरांची बदनामी करू नका अश्या शब्दात भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांनी जिल्हाध्यक्ष पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.

पत्रकार परिषद घेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील यांनी प्रकरणाची चार्जशीट दाखल झाल्यावर पुन्हा अन्य कोणाला विनाकारण गोवण्यासाठी नवीन नावे त्यात समाविष्ट केली जात असल्याचा हास्यास्पद आरोप केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी म्हणजेच राज्य सरकारने चांगलं काम केल्याचे सांगत महायुती सरकारच्या कामाचे कौतुकही केली आहे.

वरील दोन्ही परस्परविरोधी विधाने पाहता धीरज पाटील पराभवामुळे किती वैफल्यग्रस्त झाले आहेत याची प्रचिती आल्याखेरीज राहत नाही. स्वतःचा वैफल्यग्रस्तपणा त्यांनी स्वतः पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. चार्जशीट दाखल झाली असल्याचे विधान करून पाटील यांनी स्वतःच्या अकलेचे तारे तोडत कायदेविषयक अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन केल आहे. स्वतःला वकील अशी उपाधी लावून मिरवणाऱ्या धीरज पाटील यांचा त्यांच्या कायदेविषयक अज्ञानाबद्दल जाहीर सत्कार करायला हवा.

ड्रग्ज सारख्या अत्यंत दाहक आणि सामाजिक प्रश्नाचे गांभीर्य समजून न घेता केवळ पक्षीय राजकारण करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांची कीव करावी तेवढी कमी आहे. आमचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना नोव्हेंबर महिन्यात शहरातील महिलांनी ड्रग्जचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यावेळी आमदार राणादादांनी याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत माताभगिनींना आश्वस्त केले होते. त्यानुसार त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली हे सर्वश्रुत असताना धीरज पाटील राजकिय हेतूने वारंवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करत आहेत हे दुर्दैवी आहे.

आजवर पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे पाहता ते जवळपास सर्वच पक्षाशी निगडित आहेत. मात्र आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी सातत्याने भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांनी तुळजाभवानी देवीला स्मरून थोडेसे आत्मपरीक्षण करावे. आरोपींच्या यादीवर नजर मारून यात आपल्याशी निगडित कोण आहेत..? आपल्या डाव्या उजव्या बाजूला बसणारे जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबातील कोण यात सहभागी आहेत..? हे जरा उघड्या डोळ्यांनी पहावे म्हणजे त्यांना कळेल की हा प्रश्न राजकीय आहे की सामाजिक. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी ड्रग्ज सारख्या संवेदनशील विषयाचे राजकारण थांबवून तुळजापूर शहराची बदनामी करणे थांबवावे. किमान यापुढील काळात तरी आपण या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचे राजकारण करण्याचा बालिशपणा करू नये.

विठुरायाच्या पंढरीत तब्बल १४७ किलो गांजा जप्त केला गेला,श्री साई बाबांच्या शिर्डीत ड्रग्ज च्या नशेखोरांनी साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांचा भोसकून खून केला मात्र तिथल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यांचे राजकारण केले नाही.मात्र इथं जे चाललं आहे हे लाजिरवाणे आहे

यावेळी भाजप नेते सचिन पाटील,सज्जनराव साळुंखे,नारायण नन्नवरे,शांताराम पेंदे,विजय कंदले,नरेश अमृतराव,आनंद कंदले, संदिप गंगने,औदुंबर कदम,किशोर साठे, राजेश्वर (गुड्डू Jकदम,महादेव रोचकरी,शिवाजीराव बोधले,धैर्यशील दरेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!