मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंदिर महाद्वार समोर स्वागत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस दि. २९ मार्च रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई श्री तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनासाठी नळदुर्ग रोडवरील हेलिपॅड येथे आगमन झाले.मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे आगमन प्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आमदार अभिमन्यू पवार,माजी राज्यमंत्री बसवराज पाटील,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,विभागीय आयुक्त दिलीप गावडे,विशेष पोलीस महानिरीक्षक विरेश मिश्र,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते.यावेळी त्यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.