श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पोर्णिम यात्रा नियोजन आढावा बैठक – उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची बलदैवता साडेतीन शक्तीपीठ पैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेली श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सव -२०२५ च्या पूर्व तयारीचा आढावा बैठक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान शासकीय इमारतीमध्ये हि बैठक घेण्यासाठी बुधवारी दि.२६ मार्च रोजी उप जिल्हाधिकारी अरुणा गायकवाड (पुर्नवसन विभाग धाराशिव) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, मंदीर संस्थानचे सिध्देश्वर इंतुले, पुजारी मंडळाचे विपीन शिंदे, प्रा. धनंजय लोंढे, जगदीश पाटील, श्री कांबळे यांच्यासह विविध खातेप्रमुख
उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिर चैत्री पौर्णिमा यात्रा महोत्सव दि.११ ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. सदर यात्रेस येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात व यात्रा महोत्सव सुरळीतपणे पारपढावा या दृष्टीकोनातून
उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या यात्रेच्या पूर्वनियोजना बाबत यावेळी सुचना करण्यात आल्या. त्याअनुषंगाने सदर चैत्री यात्रा महोत्सव कालावधीत करावयाच्या उपाययोजना बाबतीत सुचना विविध विभागांना देण्यात आली. चैत्री पोर्णिमा धार्मिक विधी पुर्वपार परंपरेनुसार करण्याचे ठरले. तसेच यात्रा काळात घाटशिळ वाहनतळ पायऱ्यापासुन भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार असुन महाद्वारमधून भाविकांना बाहेर सोडण्यात येणार आहे. तसेच यात्रा काळात मंदिर २२ तास दर्शनार्थ खुले ठेवण्यात येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्नानासाठी भवानी तिर्थकुंड सुरु करण्यात येणार आहे तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा या बाबतीत विविध उपाययोजना संबंधित विभागाने कराव्यात अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. सदर पुर्वतयारीचा मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार हे शनिवारी आढावा बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले.