यात्रा मैदानासाठी आरक्षित जागेला महाराष्ट्र शासनाचे नाव लावा – अमोल जाधव
तुळजापूरातील महिला वर्गासह नागरिकांचा तासभर रास्ता रोको आंदोलन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील यात्रा मैदानासाठी आरक्षित जागेला महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि. २५ मार्च रोजी धाराशिव रोडवर जगदाळे कॉम्पप्लेसच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर रास्ता रोको करण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास आगामी दि.०५ एप्रिल रोजी भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तुळजापूर -धाराशिव रोडवरील मलबा स्टॉप समोरच्या जगदाळे कॉम्पलेक्स सर्वे नंबर २३८ व १३९ मधील मंजूर लेआउट रद्द करून या ठिकार्णी भाविकांसाठी यात्रा मैदान करण्याची येथील नागरिकांची जुनी मागणी आहे. यासाठी पालकमंत्र्यासह,
या प्रकरणात कारवाई न झाल्यास दि.०५ एप्रिल रोजी शहरात भिक मागो आंदोलन करण्यात येणार असून या माध्यमातून जमा झालेली रक्कम लाच म्हणून देण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे अमोल जाधव यांनी दिला आहे. तत्पूर्वी महाद्वार समोर महाआरती करण्यात आली.
जिल्हाधिकारी आर्दीना मागण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र कारवाई होत नसल्याने मंगळवार दि. २५ मार्च रोजी धाराशिव रोड वर मलबा स्टॉप जगदाळे कॉम्पप्लेक्स समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तहसीलदार अरविंद
बोळंगे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी धीरज पाटील, माजी नगरसेवक तथा गट नेते बाळासाहेब डोंगरे, गणेश कदम, नागनाथ भांजी, अमोल जाधव, महेश चोपदार, संभाजी नेपते, अभिजित कदम, रणजित इंगळे, विक्रम कदम, गोविंद लोंढे, प्रशांत सोंजी तसेच शहरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने आदी उपस्थित होत्या.