तुळजापूर पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचा वनरक्षक पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मांजरे यांनी पदभार स्वीकारण्यापासून ठाण्याला शिस्त व शहरात अवैध धंद्याला आळा घातला आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची आनंदनगर पोलीस ठाणे येथे बदली झाली. त्यानंतर आनंदनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या बद्ल दि.२२ मार्च रोजी वनविभा वनक्षत्र तुळजापूर वनरक्षक विनोद एस पाटील यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचे शाल ,श्रीफळ, फेटा बांधून स्वागत सत्कार केला त्यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरनामा न्युज चे संपादक ज्ञानेश्वर गवळी यावेळी आदि उपस्थित होते.
तुळजापूर ठाण्याला शिस्त व अवैध धंद्याला आळा
तुळजापूर शहरात चक्री, जुगार, चोरी,चक्री,अवैध धंदे , अवैध सावकारी,अतिक्रमण अशा अनेक अवैध धंद्यावर पदभार स्वीकारल्यापासून काही दिवसात नियंत्रण आणले आहे.पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी तुळजापूरनामा न्युजशी बोलताना सांगितले.