आर्थिक दृष्ट्या दुर्बल व ज्या विद्यार्थाना आई-वडील नाहीत अशा विद्यार्थाना मोफत क्लासेसमध्ये प्रवेश!
“आदित्य क्लासेस तुळजापूर ”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत प्रथमच आदित्य कोचिंग क्लासेसची गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल व ज्या विद्यार्थाना आई-वडील नाहीत अशा विद्यार्थाना मोफत क्लासेसमध्ये प्रवेश व सर्व शैक्षणिक साहित्य मोफत गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या महत्त्वाचा वारंवार उल्लेख करूनही, अनेक विद्यार्थी आर्थिक तंगीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे पालकांवर ताण येत आहे आणि अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत आदित्य क्लासेस तुळजापूर हे विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी “आदित्य क्लासेस तुळजापूर ” या क्लासेसचा उद्देश गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मदत पुरवणे हा आहे. या आदित्य क्लासेस मुळे गोर गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत होणार. विद्यार्थ्यांचे शिक्षण आदित्य क्लासेस तुळजापूर यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेतात असे श्री आप्पासाहेब सूरवसेसर यांनी दैनिक जनमत शी बोलताना सांगितले.