शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष श्रीमान सुरेश हावरे यांची श्री तुळजाभवानी सैनिक स्कूल ला सपत्नीक भेट !
तुळजापूर : प्रतिनिधी
शिर्डी संस्थानाचे माजी अध्यक्ष श्री सुरेश हावरे व सप्तनिक यांनी श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयास भेट दिली .. यावेळेस त्यांनी विद्यालयातील सर्व परिसर, वर्ग खोल्या, वर्गातील डिजिटल बोर्ड, स्मार्ट टीव्ही वरती होणारे NDA चे विशेष तास पहिले व शाळेतील अटल टिंकरिंग लॅब ला ही सदिच्छ भेट दिली. लॅब मधील विविध साहित्याची पाहणी करून त्या बद्दल अधिक माहिती जाणून घेतली विशेष म्हणजे त्यांनी 3D प्रीटिंग बद्दल ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला सदरील लॅब बद्दल व 3D प्रिंटिंग बद्दल सविस्तर माहिती विद्यालयचे कमांडन्ट साहेब व प्राचार्य साहेब यांच्या मार्गदर्शनाने श्री सावंत.डी.टी सरांनी दिली..जाताना श्री हावरे साहेबांनी शाळेच्या परिसर व येथे असलेल्या स्वछता बद्दल चे कमांडन्ट साहेब व प्राचार्य साहेब यांचे विशेष कौतुक केले..