धाराशिव येथे पोलीस मुख्यालय नविन कायदेविषय कार्यशाळा संपन्न.
धाराशिव : ज्ञानेश्वर गवळी
मा.पोलीस अधिक्षक धाराशिव श्री. संजय जाधव यांचे मार्गदशर्नाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकासाठी पोलीस मुख्यालयातील नविन जीम येथे जिल्हा स्थरावरील नविन तीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज दि.17.03.2025 रोजी 11.00 करण्यात आले. सदर कार्यशाळे मध्ये ॲड श्री. एम.एन चव्हाण,विधी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव. व ॲड अमोल गुंड चिफ डीएलएसए यांनी नविन तीन कायद्याखाली मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पोलीस अधिकारी अंमलदार यांनी विचारलेल्या शंकेचे श्री चव्हाण व श्री.गुंड यांनी निरासन करुन आवश्यक ते मार्गदर्शन केले.सदर कार्याक्रमावेळी पोलीस उप अधिक्षक मुख्यालय पोलीस निरीक्षक श्री. पाटील, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अमंलदार व नागरिक मोठ्या संख्येने पस्थित होते.