शिंदेसेनेत लवकरच फेरबदल होणार;तुळजापूर शहरात सभासद नोंदणीची अभियान
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना,या महायुतीच्या घटक पक्षात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष मोहन पणुरे, जिल्हा सहसंर्पक प्रमुख अमरराजे कदम , तालुकाध्यक्ष संभाजी पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी तुळजापूर शहरात शिवसेनेचे शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले ,युवा नेते अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सभासद नोंदणीची दि.१७ मार्च पासून प्रारंभ करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी युती अंतर्गत स्पर्धेने टोक गाठले आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी व्हायच्या तेव्हा होतील, मात्र कार्यकर्त्यांना आतापासूनच त्यासाठी चार्ज केले जात आहे. यामध्ये महायुतीअंतर्गत शिंदे शिवसेना आणि भाजपने सभासद नोंदणीची मोहीम सुरू करून आघाडीवर राहण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुका कधी होणार, त्या युती म्हणून की स्वतंत्र लढणार हे सारे प्रश्न अनुत्तरित असतानाच आपले वर्चस्व राहिलेच पाहिजे, या एकमेव भूमिकेतून हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत.
नगरपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होतील.
महायुतीअंतर्गतच शिंदे शिवसेना आणि भाजपात वर्चस्वाची लढाई होणार आहे. राजकारणात नेहमी संख्याबळाला महत्त्व असते. त्यामुळे युती असली तरी आपलेच संख्याबळ अधिक हवे यातून हे दोन्ही पक्ष ताकद पणाला लावत आहेत. सत्तापदांची वाटणी संख्याबळावर होणार असल्याने संख्याबळाला महत्त्व आले.
तुळजापूर मतदार मतदारसंघात सभासद नोंदणी सुरू करण्यात आली असून या माध्यमातून थेट सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला जाणार आहे. शाखा ही नेहमीच शिवसेनेचे बलस्थान राहिले आहे. असे शिवसेना शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी दैनिक जनमतशी बोलताना सांगितले.