धाराशिव पोलीस व नगर पालिका प्रशासनाची अवैध कत्तल खान्यावर संयुक्त कारवाई”
तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंशीय जनावरांची निर्दयपणे अवैध वाहतुक, गोमांस वाहतुक, प्राण्यांची छळवणुक, तसेच गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यासाठी अवैध पणे उभारण्यात आलेले कत्तल खाने याबाबत धाराशिव जिल्ह्यात सन 2024 व 2025 मध्ये एकुण 106 गुन्हे दाखल आहेत. धाराशिव शहर हद्दीतील खिरणीमळा,नागनाथ रोड, स्मशानभुमीच्या आलीकडे भोगावती नदीलगत गो माफीया यांनी अनाधिकृतरित्या उभे केलेले कत्तलखान्याची माहिती मिळाल्याने धाराशिव शहर पोलीस निरीक्षक श्री. शकील शेख, सपोनि रविंद्री अंभोरे, पोलीस उप निरीक्षक संदिप ओहोळ,अक्षय डिघोळे व पोलीस अंमलदार यांचेसह धाराशिव नगर परिषद चे मुख्याधिकारी श्रीमती फड, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी दि.10.03.2025 रोजी 07.00 ते 09.00 वा. सु. पोलीस विभाग धाराशिव व नगर परिषद धाराशिव यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून पुर्ण पणे निष्कासन करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शाफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शकील शेख, सपोनि रविंद्री अंभोरे, पोलीस उप निरीक्षक संदिप ओहोळ,अक्षय डिघोळे व पोलीस अंमलदार यांचेसह धाराशिव नगर परिषद चे मुख्याधिकारी श्रीमती फड, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचे पथकाने केली आहे.