मांजरा शुगर इंडस्ट्रीज मंगरूळ येथे सुरक्षा सप्ताह साजरा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात 54 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून गुरुवारी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी कारखान्याचे टाईम किपर दीपक जाधव यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली .
त्यानंतर सुरक्षा व इंजिनिअरिंग विभागातील कर्मचाऱ्यांना वापरण्यात येत असलेल्या सुरक्षिततेच्या साधनांचे प्रात्यक्षिक करूनही दाखवले यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की आपली सुरक्षा हीच कुटुंबाची सुरक्षा आहे त्यामुळे सर्व कामगार व अधिकार्यांनी काम करत असताना अपघात होऊ नये याची दक्षता घेऊन हेल्मेट सेफ्टी बूट या सर्व आवश्यक त्या सेफ्टी साधनांचा वापर करावा कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून विना अपघात काम केल्यास कामगारांची व कारखान्याची तसेच राष्ट्राची प्रगती होते तसेच कामगारांनी दिलेल्या निमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होते असे यावेळी ते म्हणाले यावेळी सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख व कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते ..