धाराशिवमध्ये 151 फूट भव्य भगवा ध्वज उभारणार – पालकमंत्र्यांची मंजुरी – सुरज साळुंके
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 151 फूट उंच भव्य दिव्य भगवा ध्वज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. या भेटीत पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रस्तावास मंजुरी देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे, सुनील काकडे, अभय इंगळे, आकाश कोकाटे, कमलाकर दाने, यश हंचाटे, समर्थ कोकाटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या भगव्या ध्वजामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा ऐतिहासिक व राष्ट्रभक्तीपूर्ण वारसा अधिक उजळणार असून, तो धाराशिव शहराचे नवसंस्कृतीक प्रतीक ठरणार आहे.