एकाच वेळी दोन ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; तुळजापूर मधील घटना
हॉटेल व्यावसायिकावर आयकर, जीएसटीची धाड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
एकाच वेळी दोन ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; तुळजापूर मधील घटना शहरात एकाच वेळी धाडसत्र सुरू केल्याने व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
शहरातील प्रतिष्ठित किराणा व हॉटेल व्यावसायिकावर सोमवारी दि.३ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाची धाड पडली असून मंगळवारी दि.४ फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत चौकशी सुरू असल्याचे समजते. यामुळे तुळजापूर शहरात चर्चा सुरू असून शहरातील इतर यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
हॉटेल, किराणासह इतर -व्यवसायांमध्ये भागीदार असलेल्या शहरातील प्रतिष्ठित व्यापारी समूहावर आयकर विभागाची तसेच सेवा व वस्तू-कर विभागाची धाड पडल्याची चर्चा आहे. सोमवारी दि.३ सायंकाळपासून मंगळवारी दि.४ संध्याकाळपर्यंत सर्व भागीदारांची चौकशी सुरू असल्याचे समजते.दरम्यान, या धाडीमागे कर चुकवेगीरीसह हवाला रॅकेटचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता आयकर विभागाची धाड पडल्याचे समजते. परंतु आयकर विभाग व सेवा व वस्तू कर विभागाने आमच्यासोबत संपर्क साधला नसल्याचे सांगितले.