प्रधानमंत्री आवास योजनेचा मोफत नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
प्रधानमंत्री आवास योजनेचा मोफत नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वतःची जागा आहे परंतु पक्के घर नाही अशा कुटुंबाकडून फॉर्म भरून घेण्यात आले. तालुक्याचे आ. राणाजगजीतसिंह पाटील व युवक नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अपसिंगा रोड वरील मोतीझरा लमान तांडा येथे भाजपच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचा मोफत नोंदणी अभियान राबवण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गंगणे, शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर, दिनेश क्षीरसागर, शहराध्यक्ष राम चोपदार, इंद्रजीत साळुंके यांनी लाभार्थीकडून अर्ज भरून घेण्यात आले. यासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी लालसिंग पवार, नितीन पवार, रमेश राठोड, सुरेखा पवार, अनुराधा चव्हाण, सीमा पवार, ताई पवार, सोनाबाई पवार कमलबाई पवार, विमल पवार आदी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. स्वतःची जागा आहे परंतु पक्के घर नाही अशा कुटुंबानी प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म भरण्याचे आवाहन भाजपचे शहर सरचिटणीस धैर्यशील दरेकर यांनी केले आहे.