आपसिंगा येथील ग्रामपंचायतमधला भ्रष्टाचार चवाट्यावर येणार का – दिपक सोनपणे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सन २०१७ ते २०२२ मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिपक सोनवणे यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. या निवेदनात असे नमूद केले आहे की, सन २०१७ ते २०२२ पर्यंत ग्रामपंचाय कार्यालय अपसिंगा येथे शासनाच्या वतीने किती निधी दिला याचा तपशील द्यावा. अंगणवाडी दुरुस्ती, साहित्य खरेदी, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, वृक्षलागवड, दुकान भाडे, पथदिवे, पाणीपुरवठा, टंचाई काळातील खर्च, मुतारी, शौचालय,पाणीपुरवठा व भंगार विक्रीतून किती पैसे आले व ते कुठे खर्च केले? याची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी दिपक सोनवणे यांनी केली आहे.
चुलती पुतण्याचे काळे कारनामे उघड
सरपंच व ग्रामसेवक एकाच घरातील असल्याने महिला सरपंच चुलतीच्या सह्या ग्रामसेवक ( पुतण्या चैतन्य गोरे) यानेच मारून लाखोचा घोटाळा केला आहे. चुलती पुतण्याने लोखोचा भ्रष्ट्राचार केला आहे असा अरोप दिपक सोनवणे यांनी केला आहे. काही विचारणा केल्यास मला जनतेने सरपंच केले आहे जनता ज्यावेळेस विचारेल त्यावेळी मी उत्तर देईन अशी मगरूरीची भाषा पुतण्या चैतन्य गोरे ग्रामसेवक यांनी ग्रामंचायत सदस्यांना गप्प बसवीले आहे.