डॉ.बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यातील दूषित पाणी;केशेगाव परिसरातील शिरले शेतकऱ्यांच्या शेतात.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर लि. अरविंदनगर केशेगाव येथील साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असून पूर्ण शक्तीने साखर निर्मिती सुरू आहे. या प्रक्रियेसाठी वापरून झालेले केमिकलयुक्त पाणी ज्यात सल्फर, ॲसिड, गंधक, चुना असतो, असा घाणयुक्त पाणी केशेगाव परिसरातील केशेगाव, विठ्ठल वाडी, शिंदेवाडी, उंबरेगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जात आहे. या विषयुक्त निळ्या रंगाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने गहू, हरभरा, द्रक्ष बाग, जवस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकयांच्या शेतातील बागायेत शेतीसह गहू पूर्ण नष्ट झाले आहे.याबाबत कारखाना प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही जानुन बुजून दूषित पाणी सोडणे बंद करण्यात आलेले नाही. कारखान्याचा दूषित पाणी कोणत्या नियमाद्वारे सोडले जात आहे,शेतकरी केमिकलयुक्त पाण्याने त्रस्त आहेत. त्यांचे संपूर्ण पीक खराब झाले असल्याने कारखाना प्रशासनावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केशेगाव परिसरा शेतकऱ्यांची मागणी होत आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी केशेगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर लि. अरविंदनगर केशेगाव येथील साखर कारखान्याचा समोर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा उचलला आहे.