विद्यार्थ्यांना गणित विषय सोप्या भाषेत समजण्यासाठी शिक्षकांनी प्राजेक्ट, क्विज, सेमिनार सारखे उपक्रम राबविण्याची गरज – आदित्य पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
विद्यार्थ्यांना गणित विषय सोप्या भाषेत समजण्यासाठी शिक्षकांनी प्राजेक्ट, क्विज, सेमिनार सारखे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी केले आहे. धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये ११ वी विज्ञान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणित प्रकल्पाचा उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील बोलत होते. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उप प्राचार्य संतोष घारगे, मार्गदर्शक प्रा. ज्योती शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. गणित प्रकल्पाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी गणित पार्क, गणितीय घड्याळ, फॅक्टर ट्री आलेख आदि विविध प्रकल्पाचा सहाय्याने विविध गणितीय सज्ञा सोप्या पध्दतीने सादर केल्या. निलोफर शेख या विद्यार्थ्यीनीने गणित पार्क, शौर्य धोंगडे या विध्यार्थ्याने वर्ग व वर्ग मुळ, विभाजक सांगणारा प्रकल्प सादर केला. डेरिवेटिव्ह, त्रिकोणमीतीचे सुत्र दाखवणारे घड्याळ लक्षवेधी ठरले. यावेळी आदित्य पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, प्रश्न विचारून सादर केलेल्या प्रकल्पा विषयी माहिती घेतली. सहभागी विद्यार्थ्यांचे आदित्य पाटील यांनी कौतुक केले. यावेळी सुभान देशमुख, निखिल साळुंके तौहीद पठाण, शताब्दी जमदाडे, अंकिता जमाले, ज्ञानेश्वरी चव्हाण, वैष्णवी फुटाणे प्रतिक्षा फुटाणे आदि ११ वी विज्ञान वर्गातील ३० – ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. गणित प्रकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
● गणित पार्क, गणितीय घड्याळचे आकर्षण यावेळी समृध्दी कराळे या विद्यार्थ्यीनीने कोणाचे विविध प्रकार, वर्तुळाची त्रीज्या, जीव्हा, छेदिका, पायथागोरसचे प्रमेय आदि विविध सज्ञा स्पष्ट करणारे गणित पार्क सादर केले होते. अस्मिता ढेकळे या विद्यार्थ्यीनींनी सेन्सर च्या सहय्याने वस्तुचे अंतर मोजण्याचा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी आकर्षण ठरले.