युवा नेते अंबरिश जाधव यांनी नुकसानग्रस्तांना पन्नास हजार रूपये अर्थिक मदत केली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील मंगळवार पेठ भागातील जुने हैदराबाद बँकेच्या पाठीमागे दिनांक ३१ जानेवारी रोजी रहीम अब्दुल सय्यद, अलिम अब्दुल सय्यद, कलिम अब्दुल सय्यद यांच्या घरी गॅस टाकीच्या स्फोटात संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक नेते विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखालीनुकसानग्रस्तांना माजी नगरसेवक अंबरिश जाधवयांच्या हस्ते पन्नास हजार रूपये अर्थिक मदत दिली आहे. नुकसान ग्रस्त कुटुंबीयांना घर बांधणीसाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे यावेळी आश्वासन युवक नेते अंबरिश जाधव यांनी दिले आहे.यावेळी नुकसानग्रस्त कुंटुंब आदिं उपस्थित होते.