जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक
भूम: औदुंबर जाधव
श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेले कृषी या विषयांतर्गत सेंद्रिय शेतीसाठी पूरक यंत्र याची जिल्हास्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल कळंब या ठिकाणी उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाने निवड झाली. प्रशालेच्यावतीने आज दिनांक 21 /01/ 2025 संस्थेचे अध्यक्ष श्री व्यंकटराव मोटे पर्यवेक्षक तथा संस्थेचे सचिव श्री सतीश देशमुख, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दत्ता भालेराव सर यांनी या विद्यार्थ्यांचा व प्रयोगास मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री संतोष राऊत सर यांचा सत्कार केला , सदर प्रयोगासाठी अटल टिंकरिंग लॅब चे सहाय्यक शिक्षक श्री अजहर सौदागर सर व श्री कानडे सर यांचे सहकार्य लाभले . सूत्रसंचालन श्री पोपट बांगर सर यांनी केले .
तसेच प्रशालेचे प्रसिद्धी प्रमुख श्री विठ्ठलराव दहिटणेकर सर यांनी छायांकन केले .