जिल्हास्तरावर विशाखा समिती, नेमता यत नाही ?
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमता येते;अशी शासन निर्णयात स्पष्ट तरतुद आहे.
धाराशिव : प्रतिनिधी
श्रीमती मृणाल जाधव यांचे तक्रारीचे अनुषंगाने सुरु असलेल्या चौकशी समितीच्या अधिकारक्षेत्राबाबत दि.२२ जानेवारी रोजी मा.अध्यक्षा,विशाखा समिती,धाराशिव यांना संजयकुमार डव्हळे निलंबित उपजिल्हाधिकारी धाराशिव यांनी तक्रार दिली आहे.या तक्रारी अर्जांत असे नमूद केले आहे की,दि. २२/०१/२०२५ रोजी आपलेकडे सुरु असलेल्या उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे विरुद्धच्या चौकशी अनुषंगाने सविनय सादर करण्यात येते की, दिनांक १९/०९/२००६ हा महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक : मकचौ-२००६/प्र.क्र.१५ मकक, चे अवलोकन व्हावे सदरील शासननिर्णच विशाखा समिती संदर्भात आहे.यातील पान क्र.५ वर तक्रारीची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची रचना दिल्लोली आहे. त्यातील तरतुद ‘ब’ चे अवलोकन व्हावे ‘ब)-“ज्या अधिकाराविरुद्ध तक्रार करण्यात आली असेल तो अधिकारी त्या क्षेत्रातील गट अ किवा गट ब सेवामधील अधिकारी असेल तर चौकशी समिती, सदस्य सचिव म्हणून महिला कल्याण अधिकारांसह संबंधित विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमता येईल.अशी स्पष्ट तरतुद आहे. उपजिल्हाधिकारी (गट अ) संवर्गातील अधिकारी आहे. वरील तरतुदीनुसार डव्हळे यांच्या विरुद्ध तक्रार असल्यास त्यासाठी विभागीय आयुक्क स्तरावर समिती महिला कल्याण अधिकारासह समिती नेमण्याची तरतुद आहे…त्यामुळे जिल्हास्तरावर आपले अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये महिला कल्याण आपणास अधिकारी नाही व वर्ग १ (गट अ) मधील आधिकारावरील आरोपाची चौकशी कण्याचे अधिकार नाहीत.सदर चौकशी आपण मा. विभागीय आयुक्त यांच्या विभागस्तरीय समितीकडे वर्ग करावी आणि डव्हळे यांना न्याय द्यावा संजयकुमार डव्हळे निलंबित उपजिल्हाधिकारी धाराशिव यांनी लेखी तक्रार दिली आहे. हे तक्रारी अर्ज माहितीस्तवमा.अपर मुख्य सचिव, महासष्ट्र शासन , मा. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर.,मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांना माहितीस्त्व तक्रारी अर्ज दिला आहे.संजयकुमार डव्हळे निलंबित उपजिल्हाधिकारी धाराशिव यांची स्वाक्षरी आहे.